तिने त्या व्यक्तीला न्याहाळले. एकदा स्वतःकडे बघितले : तोंडावर कापड बांधलेलं, आणि अंगभर कपडे. परत एकदा त्या व्यक्तिकडे बघितलं.
अंगावर फाटके कपडे, धुळीने माखलेला चेहरा आणि अस्वच्छ केस, पायात ना चपला होत्या ना हातात काही सामान. पण डोळे.. डोळ्यात तेज भरलेलं. त्या दोन छोट्या चकाकणा-या डोळ्यांमधे मावणार नाहीत एवढी असंख्य स्वप्न. मनातले भाव समोरच्याच्या मनात उमटतील एवढे बोलके डोळे. आणि एक अशी गोष्ट जी त्या फाटक्या अनवाणी मुलीकडे होती पण तिच्याकडे नव्हती - चेहर्यावरचे हास्यं.
तिच्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात ओठांवरच्या हास्याची जागा कपाळावरील आठ्यांनी घेतली होती. पण त्या छोट्या मुलीच्या चेहर्यावर मोठं हसू होतं.. ते जे तिच्या मनात उमटलं आणि हळुवार डोळ्यांतून सहज बाहेर पडलं.
khup chan shara
ReplyDelete"i saw life,in her eyes"
Thanks Shara!
DeleteAmazing creativity !!
ReplyDeleteAmazing creativity !!
ReplyDeleteNyc one
ReplyDelete.❤
Thank you!❤
Delete